रविवार, २८ जुलै, २०१९

शूर सैनिक

रणवीर हा भारतीय सैन्यदला मध्ये सैनिक होता. तो खूप धाडसी होता. लहापणापासूनच त्याला सैन्यात जायला आवडत होत. मोठा झाल्यावर मग तो सैन्यामध्ये भरती झाला. त्याचे स्वप्न पूर्ण झाले. देशाची सेवा करताना त्याला खूप आनंद वाटायचा. त्याची पोस्टिंग बराच काळ काश्मीरमध्ये होती. काश्मीर ला असताना त्याची बऱ्याच मेंढपाळ सोबत ओळख झाली. रणवीर हा मन मोकळ्या स्वभावाचा होता, त्याच्याशी सर्वांना बोलायला आवडायचं. त्याच्या गटात तो सर्वांना आवडायचा. मेंढपाळ रणवीर सोबत बोलायचे, स्वतःविषयी सांगायचे. पाकिस्तान जवळच्या सीमेवर काही ठिकाणी हिवाळ्यात खूप बर्फ पडतो. अतिशय थंडी असते. दैनंदिन कामे कठीण होऊन बसतात. मग अशावेळेस आपले भारतीय सैनिक आणि पाकिस्तानचे सैनिक सीमेपासून  दूर जातात, हिवाळा संपला की परत दोन्हीं देशाचे सैनिक सीमेजवळ येतात. हिवाळा संपल्यानंतर बर्फसुद्धा राहत नाही,आणि सैनिक आपले काम करू शकतात.                                             पण आता मात्र परिस्थिती वेगळीच होती.पाकिस्तानच्या बाजूचा बर्फ लवकर विरघळला होता व पाकिस्तानने भारताच्या सर्हद्दित घुसखोरी केली होती. सीमेपासून खूप दूरपर्यंत पाकिस्तानचे सैनिक येऊन पोहोचले होते. पाकिस्तानने आपल्या देशावर आक्रमण केले होते. भारताच्या बाजूने काही सैनिकांच्या तुकड्या जेंव्हा तिथे पोहोचल्या तेंव्हा पाकिस्तानच्या घुसखोरांनी त्यांना मारले. आपले जवान शहीद झाले.                                                                               आता ह्या घुसखोरांना आपल्या देशाच्या भूमी वरून नष्ट करायचे होते.आपल्या मातृभूमीची सुटका करायची होती. पाकिस्तानच्या सैनिकांचा ठावठिकाणा लागत नव्हता. ते लपून हल्ला करत.ते उंचावर असल्यामुळे भारतीय सैनिकांना अंदाज घेणं कठीण झालं होत. पाकिस्तानचे सैनिक कुठे कुठे आहेत हे शोधण्याचं काम मात्र रणवीर करत होता. मेंढपाळ कडून ही सर्व माहिती त्याला मिळत होती. आणि त्यामुळे आपल्या शेकडो सैनिकांचे प्राण वाचत होते. पाकिस्तानच्या सैनिकांची स्थिती कळल्यामुळे अता आपले सैनिक घुसखोरांना ठार करत होते. आपल्या देशाची एक एक इंच जमीन आपल्या ताब्यात येत होती. रणवीर तर फार शौर्याने लढत होता. स्वतःचा जीव गेला तरी पर्वा नाही पण ह्या घुसखोरांना मी सोडणार नाही. अशी गर्जना तो करत होता. आपले बाकीचे सैनिक सुद्धा पुऱ्या ताकतीने लढत होते. ह्या सर्वांनी पाकिस्तानच्या सैनिकांना पिटाळून लावलं होत. एका महिन्या पासून युद्ध सुरू होत, आपले काही सैनिक शहीद झाले होते.पाकिस्तानच्या खूप सैनिकांचा खात्मा केला गेला होता. आपली भूमी परकियापासून मुक्त झाली होती. पुन्हा एकदा ह्या शूर सैनिकामुळे शत्रू हरला होता. आपण जिंकलो होतो. आता मात्र आपले भारतीय सैनिक हिवाळा असताना सुद्धा तिथल्या सीमेवर कडा पहारा देतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा